Select Page

कविता

 

 

राधेश्याम रंगनाम

एक तुझा रंग हरी
चढतो तनुवरी
मग जातो मनामधे
तिथून अंतरी

आज रंगपंचमी
पंचप्राण रंगती
राधा ही खुलते कशी
प्रिया असशी संगती

मार पिचकारी भरून
रंग प्रीत वाटतो
भाव मनी प्रेमाचा
नभी घनुसम दाटतो

किती असल्या जरी गोपा
मीच हृदयरागिणी
छेड राग अनुरागी
मी तुझी अनुगामिनी

राधेश्याम रंगनाम
रंगुनी जरा
नित्य नवा वाहतोच
प्रीतीचा झरा

रंग असे चढले खरे
लिप्त अमर हो
प्रीत तुझी माझी सख्या
अजरामर हो

रचना©डॉ.मंजूषा कुलकर्णी
दि.१२/०३/२०२३
०७.५८ वा.
रंगपंचमी शुभकामना