कविता
रंग प्रीत भरले
ओका बोका नाही
मी तर रंगलेला बोका
म्हणतो ना दिसतो कसा
रंगीत छानच! हो का !
खिडकीत समोरच्या
मनातली मनी
रंग तिला लावणार
सांगतो मी कानी
शुभ्र अशी गोड दिसे
अदा तिच्या भारी
मान वेळाऊनी पाहते
मनुली माझी घारी
आज तिला दूध दही
लस्सी ही मी देईन
रंग रंगलेल्या
बोळात जरा नेईन
घेत पिचकारी
उडवून तिच्यावरी
भिजवून देत माझ्या
रंगात तिला पूरी
मग अंग झटकेल
मिश्कील नजर पाही
शेपटीस वळव वळवून
नखरेच करीत राही
कित्येक दिवस मनी माझी
रंगलेली राहील
गोड किती ढंग तिचे
रंगमनी पाहील, मी रंगमनी पाहील
होळी अशी रंग देई
रंग प्रीत भरले
बोका ना एकटा मी
क्षण संगी उरले
रचना©डॉ.मंजूषा कुलकर्णी
दि. ०७/०३/२०२३
सकाळी ०८.५३ वा.
होळी व धुळवडीच्या रंगीत शुभेच्छा